राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षावर लैंगीक अत्याचाराच्या गुन्हा दाखल
उस्मानाबाद : राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षावर लैंगीक अत्याचाराच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे हद्दीत एका गावातील एक 50 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. सन 2012 ते 07.10.2022 रोजी 19.00 वा.सु.सदर महिला ही एकटी असताना गावातील एका तरुणाने सदर महिला ही एकटी असल्याचा फायदा जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.02.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-376(1), 376, (2)(एन), 354, 354(अ), 323, 504, 506 अ.जा.ज.अ.प्र. 3(1)(डब्ल्यु)(i)(ii) 3(2) (व्ही), 3(2)(व्हिए), 3(1) (आर)(एस) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आले आहे. व या प्रकरणात न्यायालयने तीन दिवस पोलिस कोठडीत सुनावणी आहे.