डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व सोयीसुविधांचा योग्य वापर करून यशाच्या मार्गाने जायला हवे - भांगे

0

डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व सोयीसुविधांचा योग्य वापर करून यशाच्या मार्गाने जायला हवे - भांगे

उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) - युपीएससी व एमपीएससीसह इतर कुठल्याही परीक्षेत यश मिळवयाचे असेल तर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेल्या सर्व सोयीसुविधांचा फायदा घेऊन यश संपादन केल पाहिजे. कारण डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा योग्य वापर करून यशाच्या मार्गाने जायला हवे असे प्रतिपादन नुकतेच युपीएससी झालेले सिद्धार्थ भांगे यांनी दि.८ जून रोजी केले.

युपीएससी या परिक्षेत यश संपादन केल्यामुळे त्यांचा उस्मानाबाद शहरातील अजिंठा नगर येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी भांगे बोलत होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते भैय्यासाहेब नागटीळे, विकास बनसोडे, मृत्युंजय बनसोडे, रमेश गंगावणे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भांगे म्हणाले की, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपजिवीकेसाठी ५० वर्षांपूर्वी कुटूंब पुण्यात स्थलांतरित झाले.  तेथेच बारावी व पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र बारावी नंतर युपीएससी करण्याचे ठरविले व अवघ्या २३ व्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन करून ७०० व्या रँकने यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच यासाठी  अभ्यासातील सातत्य सोडले नाही. तर अभ्यास एके अभ्यास न करता आपले छंद ही जोपासत नियमित व्यायाम, योगासने आधी गोष्टी केल्या. त्यामुळे आयुष्यात काय करायचे हे पक्के ठरवून त्यानुसार मार्गक्रमण करावे असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी सिद्धार्थ बांगे यांच्यासह त्यांच्या आई, वडील, आजी व आजोबा यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलंकार बनसोडे यांनी तर आभार विकास बनसोडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top