उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

0



उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई 


 

बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) नवनाथ बाबुराव जाधव, वय 57 वर्षे, रा. लासोना ता. जि. उस्मानाबाद आरोपी नामे-2)एम. एम. लाकाळ रा. पळसप ता.जि. उस्मानाबाद हे दोघे दि 29.07.2023 रोजी 18.30 वा. सु. समुद्रवाणी येथील देशी दारु दुकान हॉटेल रुद्र बिअर बार ॲन्ड परमिट रुम समोर मोकळ्या जागेत अंदाजे 2,635 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)रेखा विश्वंभर काळे, वय 36 वर्षे, रा. पारधीपीढी, तेर, ता. जि. उस्मानाबाद या दि 30.07.2023 रोजी 12.00 वा. सु. पारधीपीढी तेर येथे अंदाजे 56,000 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत 700 लि. रासायनिक द्रव  व 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)यल्लालिंग अण्णासाहेब मंडले, वय 33 वर्षे, रा. मुरळी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद दि.30.07.2023 रोजी 19.15 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत अंदाजे 2,975₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या व  13 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top