उस्मानाबाद :
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा आजचा 'मन की बात' कार्यक्रम किशोर पवार यांच्या निवासस्थानी गणेश नगर, उस्मानाबाद येथे बुथ कमिटी सदस्य, शक्ती केंद्र प्रमूख, महिला भजनी मंडळ, स्थानिक रहिवाशी सोबत मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पाहिला.
'मन की बात' कार्यक्रमाचा हा १०३ वा भाग असून पंतप्रधानांचे वक्तव्य प्रचंड प्रेरणा देणारे होते. यावेळी मा.जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी समजुन घेतल्या.
मा.पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन पुढील कार्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.. सध्या सुरू असलेला पावसाळा ऋतु वृक्षारोपणासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्या अनुषंगाने वृक्षारोपणासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अमृत महोत्सवानिमित्त पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या ६०,००० पेक्षा अधिक सरोवरांमध्ये पाणी साठले आहे. आणखी ५०,००० पेक्षा अधिक अमृत सरोवर बांधण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत.. श्रावण महिना हा सण उत्सवांचा महिना असून भारतीय संस्कृतीचा आपल्याला मिळालेला हा पवित्र वारसा आहे.. जागतिक योग दिनानिमित्त आपण सर्वांनी योग दिन साजरा केला. आरोग्य ही सर्वांची प्राथमिक गरज असून आरोग्य संवर्धनासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे.. असे संबोधन मा.पंतप्रधानांनी केले..
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी, हिमत भोसले,किशोर पवार, सविता शिंदे, महादेव शिंदे, देवकते मॅडम, गुंडाळे, इंदुबाई, मोरे मॅडम, प्रमोद पवार, सचिन देशमुख, गोपीनाथ पवार आदी उपस्थित होते.