राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे आंदोलन - RSP

0
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे आंदोलन

Osmanabadnews -
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली जन स्वराज्य यात्रा मुंबई येथे अंधेरी पोलिसांनी रोखली आहे. पोलिसांनी दडपशाही करुन जानकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे रविवार, 30 जुलै रोजी दुपारी रासपाच्या वतीने राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. सगळ्यात कणखर महादेव जानकर, या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी बोलताना रासप तालुकाध्यक्ष सचिन देवकते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे स्वराज्य महाराष्ट्रासह देशात निर्माण व्हावे याकरिता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात पंढरपूर येथून सुरु झालेली जनस्वराज्य यात्रा माढा, अहमदनगर, दक्षिण मुंबईतील सहा लोकसभांमधून जात होती. दुपारपर्यंत पोलीस यात्रेला पोलीस संरक्षण होते. परंतु दुपारनंतर पोलीस संरक्षण काढून घेत श्री. जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. म्हणून पोलिस बळाचा वापर करून यात्रा अडविणार्‍या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे देवकते यांनी सांगितले.

या आंदोलनात रासपचे तालुकाध्यक्ष सचिन देवकते, महिला जिल्हाध्यक्ष सुहासिनीताई पाटील, सचिव शबनम शेख, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष गंगाताई काकडे, जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ धायगुडे, तालुका उपाध्यक्ष विजय वैद्य, तालुका उपाध्यक्ष सतीश डोलारे, केशव सलगर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमाकांत लकडे यांनी भेट देऊन पाठींबा जाहीर केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top