२५ जुलै पासून सुब्रतो मुखर्जी , फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेला सुरुवात

0

 २५ जुलै  पासून सुब्रतो मुखर्जी , फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेला सुरुवात

     

उस्मानाबाद,दि,12( osmanabad news ):- येथील जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालययांच्या संयुक्त विद्यमाने 62 वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा  दि. 25 जुलै 26 ते 2023  या कालावधीत  श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे. 14 वर्षाखालील मुलेदिनांक 01 जानेवारी, 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा,17 वर्षाखालील मुले व मुली ( दिनांक 01 जानेवारी, 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा,जे संघ  या स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा संघांनी DSO Osmanabad या संकेत स्थळावर दि. 23 जुलै,  2023 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे  अनिवार्य आहे

          सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत सहभागी होताना खेळाडूंकडे जन्म दाखलाआधार कार्डवैद्यकीय प्रमाणपत्र व विहीत नमुन्यातील  ओळखपत्र स्पर्धा स्थळी जमा करणे आवश्यक आहे.

 स्पर्धेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी  नदीम शेख  यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  या स्पर्धेमध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा / महाविद्यालयाच्या  संघाने सहभाग नोंदवावा  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top