अनावधानाने घडलेल्या चूकीसाठी मी माफी मागतो - आ. अभिमन्यू पवार
कासार सिरसी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करुन आणल्याबद्दल कासार सिरसी मंडळातील नागरिकांनी आयोजित केलेला सत्कार स्वीकारण्यापूर्वी मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना माझ्याकडून अनावधानाने महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवला गेला. हे अनावधानाने घडले असले तरी चूकीचेच आहे. झालेल्या चूकीबद्दल मी जाहीरपणे माफी मागतो. भविष्यात अशी चूक होणार नाही याचीही काळजी घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
अशी पोस्ट लातुर जिल्ह्यातील औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पोस्ट केली आहे