103 वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव प्रभाग क्र. 07 मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न....
उस्मानाबाद : दि.1ऑगस्ट 2023 रोजी 103 वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीउत्सव सोहळा मोठया उत्साहात पार पडला. सकाळी ठिक 10 : 30 वा.सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत ज्येष्ठ महिलांच्या व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करुन त्रिवार वंदन करून व "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो" असा सामूहिक जयघोष घेण्यात आला. तसेच कार्यक्रमांमध्ये मिठाई वाटप करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला,युवक उपस्थित होते.