मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सव विविध स्मारक बांधकाम व सुशोभीकरणास दोन कोटी रुपये मंजूर
उस्मानाबाद,दि.11( osmanabad news ):- 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी शासनाकडुन उस्मानाबाद जिल्हयासाठी जिल्हा नियोजन समिती कडील रु.2.00 कोटी रुपयांच्या विविध हुतात्मा स्मारक बांधकाम करणे, सुशोभिकरण करणे, स्मृतीस्तंभ बांधकाम करण्यासाठी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दि. 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या बैठकीत मान्यता प्रदान केलेली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील चिलवडी, केशेगाव, अंबेजवळगा, आळणी, रुईभर उपळा, आपसिंगा, तुळजापुर, अणदुर, नंदगाव, गुंजोटी, ईट, हिप्परगा, देवधानोरा व वाशी येथील श्रीधर वर्तक चौक सुशोभिकरण करण्यासाठी रु.2.00 ( रु. दोन कोटी) रुपयांच्या प्रस्तावित बांधकामास पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी मान्यता प्रदान केलेली आहे.