google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा नांमतरण राजपत्र प्रसिद्धी , नांमतरण विरोधी समिती पुन्हा कोर्टात जाणार

औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा नांमतरण राजपत्र प्रसिद्धी , नांमतरण विरोधी समिती पुन्हा कोर्टात जाणार

0

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मोठ्या निर्णय , औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हा नाव बदले औरंगाबाद - छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद - धाराशिव असे करण्यात आले आहे 

औरंगाबाद - छत्रपती संभाजी नगर येथे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडा साठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र त्या अगोदरच  राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असुन औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे असे राजपत्र प्रसिद्धी केलं आहे.

राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे अखेर जिल्हा, तालुका गाव धाराशिव झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध, उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे नाव आता धाराशिव असणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात धाराशिव नामकरण बाबत याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळी राज्य सरकारने कोर्टात सांगितले की केवळ धाराशिव शहराचे नाव बाबत राजपत्र प्रसिद्धी केले आहे त्यामुळे धाराशिव जिल्हा व धाराशिव तालुका बाबत याचिका निकाली निघाली नेमकी हीच कायदेशीर बाब साधत सरकारने जिल्हा, उप विभाग व तालुका याचे धाराशिव राजपत्र प्रसिद्ध करीत अधिसूचना काढली.  

नांमतरणा बाबत मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नामांतरण विरोधी समितीच्या वतीने उस्मानाबाद न्यूज बोलताना माहिती देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top