राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धाराशिव येथे आ. पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन
यापुढे पवार कुटुंबियांविषयी अपशब्द वापरल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही - जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचा इशारा
उस्मानाबाद धाराशिव-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सतत आक्षेपार्ह विधान करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि.19) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे हाणून आंदोलन केले. या पडळकरचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देऊन कार्यकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर टिका करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. म्हणून धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना धुरगुडे म्हणाले की, पडळकर हे सतत पवार कुटुंबियांवर टिका करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असतात. अपशब्द वापरून कोणी मोठे होत नसते. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पडळकर हे सत्तेत आहेत. म्हणून पडळकर यांच्या तोंडाला त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी आवर घालावा, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशाराही जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी दिला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या जोडे मारो आंदोलनात भूम-परंडा-वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,
वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, परंडा तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय सेल जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सहकार सेल जिल्हाध्यक्ष महेश नलावडे, सामाजिक न्याय शहराध्यक्ष विक्रम कांबळे, परंडा तालुका उपाध्यक्ष अतुल गोफणे, परंडा तालुका कार्याध्यक्ष बिभीषण खुणे, आळणी गावचे सरपंच प्रमोद वीर, केशेगाव शिंदेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच बालाजी शिंदे, तीर्थ गावचे उपसरपंच विनोद जाधव, सामाजिक जिल्हा सहसचिव राजाभाऊ जानराव, आंबेजळगा जि.प. गटप्रमुख सुरेश राठोड, केशेगाव जि. प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे, विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, मलंग शेख, फिरोज पठाण, महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, पृथ्वीराज आंधळे, सुलोचना जाधव, मनीषा औटी, संदीप बनसोडे, प्रताप शिंदे, अमोल भातभागे, वैभव मोरे, सोहेल बागवान, नितीन आबा रोचकरी, गोविंद देवकर, ओबीसी तालुकाध्यक्ष विकी घुगे, कदम यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.