उस्मानाबाद - धाराशिव : जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , शहरात मोटार सायकल चोरी
उस्मानाबाद - धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- मोहमद हुसेन अली सय्यद, वय 45 वर्षे, रा.वैराग नाका,फकीरा नगर, उस्मानाबाद -धाराशिव यांची अंदाजे 45,000₹ किंमतीची होन्डा शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 0812 जिचा चेसी नं ME 4JC852 GLD036100 व इंजिन नं- JC85E 00060583 ही. दि. 16.09.2023 रोजी 23.40 ते दि. 17.09.2023 रोजी 06.00 वा. सु. मोहमद सय्यद यांचे राहत्या घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी मोहमद सय्यद यांनी दि.18.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सगजान तुळशीराम नागरगोजे, वय 48 वर्षे, रा.जयवंतनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे जयवंतनगर येथील शेत गट नं 93 मधील सौरउर्जाची मोटार पंप अंदाजे 16,500₹ किंमतीचा व वायर 500₹ असा एकुण 17,000₹ किंमतीचे साहित्या हे दि.16.09.2023 रोजी 11.00 ते दि.17.09.2023 रोजी 04.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी सगजान नागरगोजे यांनी दि.18.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-हनुमंत देवराव शेळके, वय 76 वर्षे, रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव हे दि. 11.09.2023 रोजी 08.30 ते 20.00 वा. सु. उंद्री ता. चिखली जि. बुलढाणा ते परंडा बसस्थानक दरम्यान बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेवून हनुमंत शेळके यांचे बॅगमधील 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1,43,000₹ किंमतीचे अज्ञात व्याक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी हनुमंत शेळके यांनी दि.18.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.