गणेशउत्सव व ईद ए मिलाद पार्श्वभुमीवर पोलीसांचे चोख बंदोबस्ताचे नियोजन
धाराशिव जिल्ह्यात दिनांक 19.09.2023 ते दिंनाक 28.09.2023 या कालावधीत “ श्रीगणेशोत्सव” साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने दररोज पारंपारीक पूजा, आरती, देखावे, सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत असतात तसेच दिनांक 28/09/2023 रोजी श्रीं ची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.
तसेच मुस्लीम धर्मियांचे वतिने ईद ए मिलाद हा सण दिनांक 28/09/2023 रोजी साजरा करण्यात येतो. परंतु श्री गणेश विसर्जन मिरवणुक व ईद ए मिलाद जुलुस मिरवणूक एकाच दिवशी येत असल्याने धाराशिव जिल्ह्यातील मुस्लीम बांधवानी ईद ए मिलाद जुलूस मिरवणूक ही दिनांक 29.09.2023 रोजी काढण्या बाबत स्वंयस्फुर्तीने निर्णय घेतलेला आहे.
श्री. गणेशोत्स्व व ईद ए मिलाद अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा (महसुल, पोलीस, महावितरण कंपनी, उप प्रादेशीक परिवहन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था ) इत्यादी दक्ष असुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाकडून गणेशोत्सव ईद ए मिलाद अनुषंगाने गणेश मंडाळाचे पदाधिकारी समवेत 539 बैठका तसेच शांतता समितीच्या 163 बैठका, मोहल्ला समितीच्या 93 बैठका घेवून जिल्ह्यातील सण उत्सव शांततेत व सौर्हादपुर्ण वातावरणात पार पडावे या दृष्टीने बैठकी दरम्यान सर्वांना आवाहन करण्यात आलेले आहे. श्री. गणेश उत्सव व ईद ए मिलाद शांततेत पार पडावा या करीता धाराशिव जिल्ह्यातील 725 पेक्षा अधिक गुंड, उपद्रवी, समाजकंटक व गुन्हेगार वृत्तीचे इसमाविरुध्द विविध कायद्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात सण उत्सव शांततेत पार पडावे या करीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत. श्री गणेशउत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने बंदोबस्त करीता धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी 90, पोलीस अमंलदार 1,060 तसेच दंगल नियंत्रण 04 पथके, जलदप्रतिसाद चे 02 पथके यांचे सह अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून SRPF चे 02 प्लाटून तसेच 700 पुरुष व 75 महिला असे 775 गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. सदर गणेश उत्सवा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा योग्य त्या बक्षीसासह सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच गणेश उत्सव व ईद- ए- मिलाद सोहळा जनसहभागातून निर्विघ्नपने पार पाडण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे. तसेच गणेश उत्सवा दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
1)श्री. गणेश उत्सव व ईद- ए- मिलाद अनुषंगाने नागरिकांनी ऐकमेकांच्या धार्मिक पंरपरा व रितीरिवाजाचा आदर करुन सौहार्द पुर्ण वातावरणात सण उत्सव शांततेत पार पाडावेत.
2) नागरिकांनी अफवांवर स सोशलमिडीयावर प्रसारित होणारे संदेश यावर विश्वास न ठेवता सण उत्सव शांततेत पार पाडावेत.
3) नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या निर्देश/ आदेशाचे पालन करावे.
4)सदर श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण उत्सवा दरम्यान ध्वनीप्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. DJ अथवा मोठ्या आवाजाचे स्पिकर जावू नये म्हणजे ध्वनीप्रदुषण होणार नाहीपर्यावरण संरक्षण अधिनियमाचे तंतोतंत पालन करावे.
5)आपात्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहीका, अग्नीशमन वाहन यांना अडथळा होऊ नये म्हणून रस्त्यावर मंडप उभा करु नये.
6)गणेश विसर्जन मिरवणुका हृया लवकर काढून दिलेल्या वेळेत पुर्वी संपवाव्यात लहान मुले महिला यांना विसर्जन मिरवणुकामध्ये भाग घेता यावा म्हणून मिरवणूका दिवसा काढण्यास प्राधान्य द्यावे.


