गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडियावर असणारी करडी नजरेतला संवेदनशीपणा
मुंबईतील एका दिव्यांग मॉडेलनं केलेल्या तक्रारीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तात्काळ दखल. दिव्यांग तरूणी व्हिलचेअरवर आल्यानं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तिच्या स्वताच्याच विवाह नोंदणीसाठी झाली होती अडचण. संबंधित रजिस्टार दुसर्या मजल्यावर असल्या कारणान मॅाडेल विराली मोदीचा रजिस्टर विवाहातच आला होता अडथळा , विरालीनं थेट देवेंद्र फडणवीसांना ट्विट करत मांडली आपली अडचण या तक्रारीची तात्काळ दखल देत संबंधित रजिस्टार अधिकार्याला दिल्या तात्काळ दखल घेण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका फोननंतर सुत्र हलली आणि तरूणीच्या लग्नासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लागली. यानंतर लग्नाचे फोटो ट्विट करत संबंधित तरूणीनं मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले.
मात्र झाल्या प्रकाराबद्दल नम्रपुर्वक माफी मागत यापुढे याबाबत काळजी घेऊ असही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच आश्वासन दिले आहे.