कृष्णा खोऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पाणी अवर्षणग्रस्त उमरगा-लोहारा तालुक्यांना देण्यासाठी तातडीने काम सुरू करा- भाजपा जिल्हाध्यक्ष चालुक्य

0


कृष्णा खोऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पाणी अवर्षणग्रस्त उमरगा-लोहारा तालुक्यांना देण्यासाठी तातडीने काम सुरू करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा जिल्हाध्यक्ष चालुक्य यांचे निवेदन


उस्मानाबाद-धाराशिव-
कृष्णा खोऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पाणी अवर्षणग्रस्त उमरगा-लोहारा तालुक्यांना देण्यासाठी तातडीने काम सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. चालुक्य यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देऊन कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पावाबत चर्चा केली. निवेदनात म्हटले की, कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून योजनेच्या चौथ्या टप्प्यात उमरगा व लोहारा तालुक्याला पाणी मिळणार आहे. 

उमरगा व लोहारा हे तालुके अवर्षणग्रस्त असून बहुतांश लोकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी चौथ्या टप्प्यात अवर्षणग्रस्त उमरगा व लोहारा तालुक्याला मिळणार आहे. हे काम लवकरात लवकर सुरू होऊन पाणी उपलब्ध झाले तर या भागात हरितक्रांती होऊन आर्थिक सुबत्ता येईल. म्हणून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील चौथ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर सुरू करून उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणावी, असे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. चालुक्य यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top