सोलापूर - बार्शी-सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ बस आणि एर्टीगा कारची भीषण धडक बसली. या अपघातात कारमधील 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीची मदत केली.
पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. शिवसेना नेते दीपक आंधळकर यांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात हातभार लावला. एर्टीगा कार सोलापूरहुन बार्शीकडे येत होती, तर बस बार्शीतून सोलापूरकडे जात असताना 1 वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे.