२० हजार रुपयाची लाच स्वीकारताना अधिकारी ताब्यात!

0
 

 २० हजार रुपयाची लाच स्वीकारताना अधिकारी ताब्यात!


धाराशिव : २० हजार रुपयाची लाच स्वीकारताना 
संतोष बाबुराव हूरगट , कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब ( वर्ग -2-कनिष्ठ) यांस लांच लुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार पुरुष, वय 22 वर्षे यांनी तक्रार दिली होती. आरोपी संतोष बाबुराव हूरगट , वय 50 वर्षे,  कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब ( वर्ग -2-कनिष्ठ) , लाच मागणी पडताळणी  दि. 01/12/2023 , लाच स्विकारली - दि. 02/12/2023 , लाचेची मागणी रक्कम -* 20,000/- , लाच स्विकारली रक्कम - 20,000/- 

              यातील तक्रारदार यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या सामुहिक शेततळ्याचे अंदाजपत्रक / प्रस्ताव तयार करून तो  प्रस्ताव अपलोड करून अनुदान मंजुरीस पाठवून देण्यासाठी  यातील आलोसे संतोष बाबुराव हुरगट , वय 50 वर्षे,  कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब यांनी  पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रुपये लाचेची मागणी करून  20,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

 सापळा अधिकारी - नानासाहेब कदम,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9922207499*

  सापळा पर्यवेक्षण अधिकारी - सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686*


मार्गदर्शक - मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361


सापळा पथक - पोलीस अमलदार सचिन शेवाळे ,  सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय कररडे

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top