लोकशाही टिकवण्यासाठी येणारी प्रत्येक निवडणुक महत्वाची – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , MP Omprakash Rajenimbalkar

0

लोकशाही टिकवण्यासाठी येणारी प्रत्येक निवडणुक महत्वाची – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , MP Omprakash Rajenimbalkar

गद्दारांना मतदार 2024 च्या निवडणुकीत धडा शिकवणार



Osmanabad news : आज दि. 07/07/2023 रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी सजग होण्याची गरज असल्याचे उद्गार पवनराजे कॉम्लेक्स येथे झालेल्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभामध्ये काढले. मागील 9 वर्षाचा भाजपा सरकारचा आढावा घेत असताना महागाई, ईडी, भ्रष्टाचाराचे आरोप तसेच शेतकऱ्यांची होणारी अवहेलना, बेरोजगारी आदी विषयांच्या अनुषंगाने बोलत असताना महाराष्ट्रातील राजकीय चालु घडामोडीवर प्रकाश टाकत असताना अजय देवगन यांच्या गंगाजल या सिनेमातील डायलॉग म्हणत “सब पवित्र कर देंगे” अशा पध्दतीची वर्तणुक भाजपा करत असून विविध राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष फोडून भाजपा सरकारला पाठिंबा मिळवत असून पक्षाच्या एकाधिकारशाही भाजपाची वाटचाल सुरु असल्याचे सुतोवाच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे. मागील 9 वर्षातील वाढती महागाई, बेरोजगारी व इतर महत्वाच्या गोष्टीकडून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपा पध्दतशीरपणे धर्माचा राजकारणासाठी वापर करत आहे. तसेच सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन पक्षाचा विस्तार करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने सुरु आहे. कालपर्वा ज्यांच्यावर कोट्यावधी भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांना पवित्र करण्याचा नविन फॉर्मुला भाजपाने शोधुन काढला आहे. येणाऱ्या काळात जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणुन ओळख असणाऱ्या देशातील नागरिकांनी लोकशाही टिकविण्यासाठी येणारी प्रत्येक निवडणुक महत्वाची समजुन मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे उद्गार यावेळी काढले.

या सत्कार समारंभाप्रसंगी उस्मानाबाद कळंब विधानसभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलासदादा पाटील यांनी येणारी निवडणुक ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी होणार असून कोणतीही विचारसरणी नसलेल्या, सत्तेसाठी हापापलेल्या उमेदवारांना त्यांची जागा मतदानाद्वारे दाखवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

 

यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे नुतन सहसंपर्कप्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर, रणजित ज्ञानेश्वर पाटील (जिल्हाप्रमुख कळंब, वाशी, भुम आणि परांडा), दिपक जवळगे (जिल्हा संघटक धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा), दिलीप पाटील (जिल्हा संघटक कळंब, वाशी, भुम, परांडा), प्रदिप बप्पा मेटे (उपजिल्हाप्रमुख कळंब, वाशी), चेतन बोराडे (उपजिल्हाप्रमुख भूम, परांडा), अमोल बिराजदार (तालुकाप्रमुख लोहारा), सोमनाथ आप्पा गुरव (उस्मानाबाद शहरप्रमुख), मोईन पठाण (कक्ष जिल्हाप्रमुख), बजरंग जाधव (उपजिल्हाप्रमुख औसा, निलंगा) यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला तसेच नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, उपजिल्हाप्रमुख विजय (बापू) सस्ते, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, उपसरपंच पवन मोरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैंनिकातून प्रसिद्ध करण्यात यावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top