अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात तेरा छापे टाकून कारवाई

0



अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 13 छापे टाकून कारवाई 

 

धाराशिव  : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.16.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 13 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 5,000 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 285 लि. गावठी दारु, 29 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,86,160 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 13 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1) धाराशिव शहर पोठाच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-संजय राजेंद्र काळे, रा. जुना बस डेपो धाराशिव ता.जि.धाराशिव हे 08.20 वा. सु. आपल्या राहात्या घराचे समोर अंदाजे 1,10,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे 2,200 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 40 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- लक्ष्मण राजाराम निचळे, रा. इंगळे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 08.30 वा. सु. इंगळे गल्ली धाराशिव येथे अंदाजे 5,600 किंमतीचे गावठी दारु 70 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- सुनिता संजय पवार, वय 45 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पिढी धाराशिव ता. जि धाराशिव या 08.55 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 53,100 ₹ किंमतीचे 1,000लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जिजाबाई काऱ्या काळे, वय 50 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पिढी धाराशिव ता. जि धाराशिव, या 09.05 वा. सु. तुळजापूर नाका, पारधी पिढी येथे अंदाजे 63,400 ₹ किंमतीचे  1,200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

2) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-कुशावरती अशोक वडवराव, रा. मसला खु ता. तुळजापूर जि. धाराशिव  या 21.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 900 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

3) ढोकी पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी  छापे टाकले. आरेापी नामे-मनीषा अशोक चव्हाण, वय 43 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव या 17.15 वा. सु. ढोकी ते तेर जाणारे रोडलगत येथे अंदाजे 1,600 ₹किंमतीच्या 20 लि. सिंधी ताडी जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-मालनबाई बप्पा चव्हाण, वय 43 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव या 18.15 वा. सु. ढोकी ते कळंब जाणारे रोडलगत अंदाजे 1,200 किंमतीची 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जनाबाई दिनकर चव्हाण, वय 43 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव या 18.15 वा. सु. ढोकी ते कळंब जाणारे रोडलगत अंदाजे 1,600 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

4) भुम पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- शांताबाई लक्ष्मण पवार, वय 65 वर्षे, रा. शिवशंकर नगर भुम ता. भुम जि. धाराशिव या 14.15 आपल्या  राहात्या घरासमोर अंदाजे 2,000 ₹ किंमतीच्या 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

5)कळंब पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- प्रकाश शहाजी काळे, वय 52 वर्षे, रा. एम.आय.डी.सी. रोड डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. डिकसळ जाणारे रोडलगत अंदाजे 36,500 ₹ किंमतीची 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 50 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-निता महादेव काळे, वय 35 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या 17.05 इंदीरानगर कळंब येथे अंदाजे 8,750 ₹ किंमतीची 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.

6) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- बाबासाहेब प्रकाश कांबळे, वय 36 वर्षे, रा. हंगरगा नळ ता. तुळजापूर जि. धाराशिव  हे 18.30 वा. सु. हंगरगा नळ शिवारात ता. तुळजापूर येथे अंदाजे 770₹ किंमतीच्या 11 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

7) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- रेणुका प्रशांत तेलंग रा. चिलवडी ता.जि. धाराशिव हे 17.15 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर  अंदाजे 740₹ किंमतीचे 9 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.

                                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top