तुळजापूर येथे जुगार विरोधी कारवाई
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.15.12.2023 रोजी 18.30 वा. सु. तुळजापूर पो. ठा. हद्दीत देवराज कॉम्पलेक्स मधील अमोल पान शॉपचे बाजूस गाळ्यात तुळजापूर जि. धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आकाश तानाजी राजगुरु, वय 25 वर्षे, 2) अजित अशोक कांबळे,वय 29 वर्षे, रा. मातंगनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. देवराज कॉम्पलेक्स मधील अमोल पान शॉपचे बाजूस गाळ्यात तुळजापूर जि. धाराशिव ऑनलाईन चक्री जुगाराचे साहित्यासह एकुण 9,400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.