श्रीलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हासेगाव (शि.) माध्यमातून स्कूल बॅग वाटप

0
धाराशिव : श्रीलक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, हासेगाव (शि.) च्या अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग, मराठवाडा विभाग सहसंयोजक, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सौ. सरोजनीताई संतोष राऊत यांच्या हस्ते जि. प. प्राथमीक शाळा, वाठवडा व नायगाव येथील मंथन परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कूल बॅग वाटप करण्यात आले. पावसाळा सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्याचं संगोपन करणे विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे असते म्हणून शाळेतील गरजू विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला.

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाठवडा येथील प्रगती कोकाटे, प्रांजल कुंभार, आदित्य येवतकर, कपिल राऊत, योगिनी पवार, संस्कृती कोकाटे, अभय कोकाटे, समृद्धी टेकाळे, आस्था टेकाळे, नेहा येवतकर, आरुष पुंड, राधिका राऊत, रिद्धी राऊत, कोमल राऊत, प्रगती कोकाटे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नायगाव या शाळेतील राधिका गोपाळ पांचाळ, अनन्या अमोल कुलकर्णी, राजवीर केशव शितोळे, सार्थक श्रीपाल गोरे, श्रावणी शिवाजी पवार, विराज आनंद पाटील, तनुष तानाजी खंडागळे, चैतन्य कुंडलिक शितोळे, अनुष्का सतीश मेनकुदळे, तेजस्विनी मनोज शिंदे, दिव्या दत्तात्रय माळी, समृद्धी ज्योतिर्लिंग मेनकुदळे, आरुषी अप्पासाहेब गोरे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. श्रीलक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील  आणखी काही शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात येणार असल्याचे सरोजनीताई यांनी सांगितले.

      यावेळी वाठवडा येथील भाजपा युवा मोर्चा कळंब तालुका सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ टिंगरे, दिलीप दादा राऊत, प्रमोद पवार शालेय समिती अध्यक्ष शरद पवार, अमोल कोकाटे, विलास साळुंखे, अमोल साळुंखे, राजेंद्र कोकाटे, नितीन टेकाळे, महादेव अल्टो, स्वप्निल पुंड, मनोज येवतकर, बळीराम नवगिरे, किरण कुंभार, गणेश कोकाटे, प्रवीण इरपतिगिरे, यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व मुख्याध्यापक तसेच गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top