धाराशिव:
शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेत संत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे या महामानवांचे विचार आणि कार्य उलगडून दाखवले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. अण्णासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत नगनाथ पाटील, रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, सुर्यकांत बडदापुरे, खंडू पडवळ, दिपक खबोले, प्रशांत राठोड, सुधीर कांबळे, शानिमे कैलास, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, सचीन राठोड, मदनकुमार आमदापुरे, आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, श्रीमती सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे, वैशाली शितोळे, शोभा बनसोडे, गोविंद बनसोडे, मोहन बनसोडे, वसंत भिसे, अमोल जगताप, सागर सुर्यवंशी तसेच वरिष्ठ लिपिक संजीवकुमार म्हस्के यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी संत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.