10 दिवसावर उर्स आले असताना रोडचे काम अपुरे , वाहतुकीला होतोय अडथळा , प्रशासनाचे दुर्लक्ष ?

0
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
ग्रामदैवत असलेले हजरत ख्वॉजा शम्शोद्दीन गाजी यांचा उरूस १०-१२ दिवसावर आला असताना, गाजी यांच्या दर्गा समोरील रस्ताचे काम आजपण रेंगाळलेले दिसत आहे. ऊरसानिमित्त हजारो भाविक येत असतात, परंतू रस्त्याचे काम रेंगाळले आहे, याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उर्स चिरागा च्या विडिओ 2019 👇👇👇

गेल्या कांही वर्षांपासून शम्शोद्दीन गाजी व धारासूर मर्दींनीकडे जाणारा रस्ता मोठा असावा ऊरस व दस-यानिमित्त हजारो लोक या रस्त्याने दर्गा व देवीला जात असतात. त्यामुळे प्रशासनाने याकडे खास लक्ष घालून रस्त्याच्या बाजूचे घरे पाडून रस्त्याचे रूंदीकरण्याचे नियोजन केले आहे. 
परंतू गेल्या कांही वर्षांपासून रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे लोकांना त्रास होत आहे. त्यातच हजरत शम्शोद्दीन गाजी यांचा ऊरूस  ११ मार्च पासुन सुरु होणार आहे . दर्गा समोर तीनशे मीटर अंतरावर रस्त्याचे काम अपुरे ठेवल्याने वळणावर दळणवळणाची असुविधा झाली आहे. काही दिवसावर उर्स आला आहे रस्त्याचे काम न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे. याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन रस्त्याचे काम पुर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे. 
तसेच या रस्त्यावर झालेल्या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top