छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या आदेशानुसार यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त
गरजुंना मदत करण्याचा मानस आहे त्याप्रमाणे उस्मानाबाद येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज मित्रसमुह उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्था उस्मानाबाद शासकीय रुग्णालय येथे गरजूवंत रुग्णांस व नातेवाईकांना सकाळी बाराच्या सुमारास अन्नदान वाटप करण्यात आले.याप्रसंगी जलमंदिर प्रतिष्ठान व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज मित्र समूह उस्मानाबाद चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते