कोरोना सोबतचं ईतर रोगराईचा उस्मानाबाद मध्ये धोका ?

0
उस्मानाबाद -  जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुळे भारत देश 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. 

महाराष्ट्रामधील रुग्णांची संख्या वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्ण आहेत. त्यासोबतच ईतर रोगराईचा धोकाही उस्मानाबाद मध्ये नगरपालिकेच्या अस्वच्छतेमुळे वाढला आहे.
उस्मानाबाद नगरपालिकेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील स्वच्छता करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र स्वच्छता त्या किमतीमध्ये होत नाही उस्मानाबाद नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये नाल्याची दुरवस्था झाल्याने तेथील स्वच्छता केली जात नाही तर अनेक ठिकाणी कचऱ्याच्या घंटागाड्या येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार होत आहे मात्र याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे.
  शहरातील काही भागात रस्ते छोटे असल्याने तेथे अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. 

 नगरपालिकेच्या वतीने दैनंदिन स्वच्छता वैराग रोड येथे मुख्य रोडवरच केली जाते उस्मानाबाद शहरातील वैराग नाका, फकीरा नगर, शम्स पुरा या भागामध्ये तर दोन महिन्याला एकदा नाली  सफाई केली जाते तर घंटागाडी नागरिकांनी गुत्तेदार यांना फोन केल्यावर आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतर नाल्या स्वच्छतेसाठी व घंटागाड्या पाठवल्या जातात अशा तक्रारी उस्मानाबाद न्यूज च्या निदर्शनास आले आहेत.


एकी कडे जगात कोरोना ने थैमान घातले आहे त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील अनेक भागांमध्ये इतर रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाल्याचे चित्र सध्या उस्मानाबाद मध्ये दिसत आहे.

 याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना स्वच्छतेसाठी सक्तीचे आदेश काढणे गरजेचे आहे जेणेकरून इतर रोगराई पसरणार नाही.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top