उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र या तिन्ही रुग्णांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात 14 दिवस उपचार केल्यानंतर आलेले पाहिले तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच या रुग्णांच्या दुसऱ्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा असून आज संध्याकाळी पर्यंत हे अहवाल प्राप्त होतील जर ते ही अहवाल निगेटिव्ह आले तर त्या तिन्ही रूग्णांना इस्पितळातुन घरी जाण्यास परवानगी दिली जाईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी दिली आहे.
१७ एप्रिल पर्यंत ४११ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यापैकी ३५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. २ जणांचे अहवाल पोजिटिव्ह उर्वरित प्रतिक्षेत आहेत. तसेच ज्या कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला होता तीचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गलांडे यांनी दिली.