सन 2016 मधील विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेतील निवड झालेले 636 उमेदवारांनी कोणत्याही बातमीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये व गोंधळून जाऊ नये
*पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचे आवाहन व जाहीर खुलासा*
=============================
*दिनांक 25 जुलै 2020 रोजी पुणे येथील ( *पोलीस बॉईज ऑर्गनायझेशन* ) *नामक संघटनेच्या वतीने एक बातमी प्रसारित करण्यात आली होती की , सन 2016 मधील विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेतील निवड झालेले 636 उमेदवार यांची निमबाह्य निवड रद्द करण्यात यावी* *त्यामुळे ही बातमी वाचून निवड झालेल्या 636 उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की , ही बातमी पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे की काय*
*परंतु निवड झालेल्या 636 उमेदवारांना मी स्पष्टपणे सांगत आहे की पोलीस बॉईज असोसिएशनची कोणतीही शाखा पुणे जिल्ह्यात कार्यरत नाही आम्ही आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात पोलीस बॉईज असोसिएशनची स्थापनाच केलेली नाही त्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशनचा या बातमीशी कसलाही संबंध नाही*
*तुमची बातमी पोलीस बॉईज ऑर्गनायझेशन नावाची पुणे शहरातील जी संघटना आहे त्यांनी प्रसारित केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आमचा म्हणजेच पोलीस बॉईज असोसिएशनचा या बातमीशी व पोलीस बॉईज ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेशी कसलाही आणि कुठल्याही प्रकारचा अजिबात संबंध नाही किंवा आमचे कोणते पदाधिकारी यामध्ये सहभागी नाहीत त्यामुळे तुम्ही आमच्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊन नये हे आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत याची कृपया 636 उमेदवारांनी नोंद घ्यावी*
*आणि पोलीस बॉईज असोसिएशनने संपूर्ण पणे कायद्याचे पालन करून नियमाप्रमाणे रजिस्ट्रेशन केलेले आहे व आमच्या असोसिएशनचा लोगो हा सुभाषचंद्र बोस यांचा असलेला फोटो आहे व आमचा रजिस्ट्रेशन नंबर 1363 / 13 तसेच एफ 21610 / 14 असा आहे*
=============================
*सत्य परिस्थिती* :-- *या उलट सन 2016 मधील विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेतील पात्र व पास झालेले 1285 उमेदवार तसेच मेडिकल होऊन फक्त हजर होण्याच्या आदेशाची वाट पाहत असलेले 636 उमेदवार यांना लवकरात लवकर डायरेक्ट प्रोबेशनरी PSI म्हणून नियुक्ती आदेश देण्यात यावे या मागणीचे सर्वात पहिले निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातून गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांना एकमेव पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे देण्यात आले आहे व अजूनही आमची मागणी सुरूच आहे
आम्ही छातीठोक पणे सांगत आहोत की सन 2016 मधील विभागीय मर्यादित पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत पात्र व पास 1285 उमेदवार तसेच 636 उमेदवार यांना गृहमंत्री साहेब जोपर्यंत नियुक्ती आदेश देत नाहीत तोपर्यंत पोलीस बॉईज असोसिएशन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे
नियुक्ती आदेश मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत हा आमचा शब्द दिला आहे
पात्र झालेले 1285 व 636 उमेदवार यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे , मोबाईल नंबर 9604972682, 8669838008