बेंबळी ग्रामस्थांची घेतली खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट

0
इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील एक इसम स्वतःच्या उपचारासाठी उस्मानाबाद येथे गेला होता. त्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला जावे लागले.
नंतर तिथे त्या इसमाला कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण झाली. बेंबळी येथील मोटे, गल्ली, डोणे गल्ली सिल करण्यात आली. त्या परिसरात खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधला काळजी घ्या आरोग्य, जपा स्वच्छता राखा, प्रशासनाला सहकार्य करा, व संसर्गजन्य आजाराचा शिरकाव होऊ येन यांची खबरदारी घ्या असे, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार कैलास दादा पाटील, उस्मानाबाद शिवसेना ता.प्रमूख सतिषजी सोमाणी, बेंबळी पोलिस स्टेशन चे स.पो.नि.मुस्तफा शेख, नायब तहसीलदार केलुरकर, सरपंच सत्तार शेख, मजहर पठाण, गौस पठाण, उस्मानाबाद युवा सेना ता.उपप्रमूख किरण चव्हाण, शाम पाटील, बेंबळी प्रा.आरोग्य केंदातील वैदयकीय अधिकारी डाॅ.अमोल सुर्यवंशी, डाॅ.रोहीत राठोड, ग्रामसेवक करपे, तलाठी डोके, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top