ब्रिक्स मानवाधिकार मिशनच्या तालुकाध्यक्षपदी सर्जेराव गायकवाड यांची निवड...

0
-----------------------------------------------
सांगवी (का) प्रतिनिधी (भिमा भूईरकर)

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांची दि.२७ रोजी ब्रिक्स मानवाधिकार मिशनच्या तुळजापुर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
     तामलवाडी येथील शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड हे गेली २७ वर्ष मंडळाच्या माध्यमातून तामलवाडी गावामध्ये  सामाजिक कार्य करत आहेत.तसेच पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांचे चांगले काम चालु असुन त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन ब्रिक्स मानवाधिकार मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांच्या आदेशान्वये दि.२७ रोजी उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सतिश लोंढे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन  सर्जेराव गायकवाड यांची ब्रिक्स मानवाधिकार तुळजापुर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा पुष्पहार घालुन सन्मानही करण्यात आला.
     यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत,जिल्हा समन्वयक सुरज राऊत,तालुकाध्यक्ष शंकर कदम आदींनी उपस्थित राहुन गायकवाड यांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top