“ उमरगा येथून चोरीस गेलेले विदेशी मद्य जप्त, 2 आरोपी ताब्यात. ”

0


पोलीस ठाणे, उमरगा: रोहित राजेंद्र पतंगे, रा. बालाजी नगर, उमरगा यांच्या उमरगा शहरातील मनिषा बारच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 02.08.2020 ते 04.08.2020 कालावधीत तोडून आतील 52 खोकी विदेशी मद्य एकुण 3,79,680/-रु. किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन उमरगा पो.ठा. येथे गु.र.क्र. 268/2020 भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 नुसार दाखल आहे.

गुन्हा तपासात खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे उमरगा पो.ठा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. अमोल मालुसरे, पोकॉ- कांबळे, दिवे, अनिल भोसले यांच्या पथकाने आरोपी- 1) श्रीनिवास जनार्दन माने- पाटील 2) गणेश गोपाळ मडोळे, दोघे रा. उमरगा यांना दि. 20.08.2020 रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मद्यापैकी 88,320/-रु. किंमतीचे 12 खोकी विदेशी मद्य जप्त केले असुन पुढील तपास पोउपनि- श्री अमोल मालुसरे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top