उस्मानाबाद जिल्ह्यात आज दि 26/08/20 रोजी दाखल झालेले गुन्हे व जिल्ह्यात पोलीसांनी केलेल्या कारवाया..

0

 


दि. 25.08.2020 रोजी जुगार विरोधी विशेष मोहिमे दरम्यान 13 छापे.

उस्मानाबाद जिल्हा: मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशाने दि. 25.08.2020 रोजी राबवलेल्या जुगार विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जुगार साहित्य व रोख रक्कम असा 15,640 ₹ माल जप्त करण्यात आला. यावरुन 13 व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात म.जु.का. अंतर्गत 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, कळंब: विनोद जगताप, रा. कल्पनानगर, कळंब हा होळकर चौकातील पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,170/-रु. बाळगला असतांना पो.ठा. कळंब च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उमरगा: यशवंत गंगणे, रा. जळकोट हा प्रभात हॉटेल मागील गल्लीत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 750/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): शाम पेठे, रा. फकीरानगर, उस्मानाबाद हा बीएसएनएल कार्यालयाजवळील पत्राशेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,3500/-रु. बाळगलेला आढळला.

मेहराज शेख, रा. वैराग नाका हा दर्गाह रस्त्यावरील पुलावर कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,200/-रु. बाळगलेला असतांना आढळला.

इरफान शेख, रा. ख्वॉजानगर (पु.) हा गल्लीतील एम.के. हॉलजवळ मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,060/-रु. बाळगला असतांना आढळला.

राजेंद्र मगर, रा. पापनाशनगर हा जुनाबस डेपो परिसरात मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,175/-रु. बाळगला असतांना आढळला.

पोलीस ठाणे, तामलवाडी: गोविंद फुटके, रा. तामलवाडी हा तामलवाडी शिवारातील कांच ढाबा येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 515/-रु. बाळगला असतांना पो.ठा. तामलवाडी च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, लोहारा: बालाजी देशपांडे, रा. कोंडजीगड हा आपल्या घरा समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,270/-रु. बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, तुळजापूर: एजाज शेख, रा. नेताजीनगर, तुळजापूर हा मराठा खानावळी समोरील पानटपरीच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 3,020/-रु. बाळगला असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, आनंदनगर: परमेश्वर बळी, रा. काकानगर, उस्मानाबाद हा गोरोबाकाका नगर परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्य व रोख रक्कम 1,710/-रु. बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): ज्ञानेश्वर वाडवे, रा. येडशी, उस्मानाबाद हा येडशी बस स्थानकाशेजारी मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 710/-रु. बाळगला असतांना आढळला.

पोलीस ठाणे, बेंबळी: मारुती गवळी, रा. केशेगांव, ता. उस्मानाबाद हा गावातील साई हॉटेलच्या बाजूस मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,230/-रु. बाळगला असतांना आढळला.

पोलीस ठाणे, ढोकी: पिंटु देवकर, रा. तेर हा गावातील बस थांब्या शेजारी मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 480/-रु. बाळगला असतांना आढळला.

 “मनाई आदेश झुगारुन नेत असलेला 4.82 मेट्रीक टन तंबाखु नाकाबंदी दरम्यान जप्त.

पोलीस ठाणे, परंडा: कोविड- 19 संसर्गास प्रतिबंध होण्यासाठी तंबाखु विक्रीस मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन दि. 25.08.2020 रोजी आयशर मिनी ट्रक क्र. जी.जे. 16 एयु 3921 हा 4.82 मेट्रीक टन तंबाखु (किंमत 3,54,000/-रु.) वाहतूक करत असतांना सोनारी टी जंक्शन, करमाळा रस्ता येथे नाकाबंदी दरम्यान परंडा पो.ठा. च्या पथकास आढळला. यावरुन पोउपनि- श्री. दादासाहेब बनसोडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन ट्रक चालक- समीर अन्नवर राज, रा. निकोडा, ता. भरुच, राज्य- गुजरात याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

 “नाकाबंदी दरम्यान 265 कारवाया- 57,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 25.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 265 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 57,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

अवैध मद्यविरोधी कारवाया.

पोलीस ठाणे, उमरगा: 1)विलास शंकर भांगे 2)शिवराम लिंगाप्पा कवडे, दोघे रा. हिप्परगाराववाडी, ता. उमरगा हे दि. 25.08.2020 रोजी गावातील आपल्या घराजवळ गावठी दारु निर्मीतीचा 900 लि. द्रवपदार्थ व 100 लि. गावठी दारु (साहित्यासह किं.अं. 42,000/-रु.) बाळगले असतांना आढळले. तो द्रवपदार्थ पोलीसांनी जागीच ओतून नष्ट केला.

पोलीस ठाणे, येरमाळा: कुंडलीक शिंदे, रा. बावी, ता. वाशी हा दि. 25.08.2020 रोजी मौजे गोजवाडा रस्त्यावरील बाभळीच्या झाडाखाली 180 मि.ली. देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 800/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना आढळला.

        यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

(उमरगा पो.ठा. हद्दीतील अवैध मद्यविरोधी छाप्याची छायाचित्रे.)

 

अपघात.

पोलीस ठाणे, शिराढोण: चालक- ज्ञानेश्वर बसंतरावजी दर्गे, रा. सिडको नांदेड, ता. नांदेड यांनी दि. 24.08.2020 रोजी 17.30 वा. सु. ढोकी- मुरुड या राज्य मार्ग- 77 वर बस क्र. एम.एच. 13 सीयु 6934 ही निष्काळजीपणे चालवून मुदतसर सरताज मशायक, वय 25 वर्षे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 सी 2143 ला समोरुन धडक दिली. या अपघातात मुदतसर मशायक हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मुस्ताफा सरताज मशायक (मयताचा भाऊ) यांनी दि. 25.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, मुरुम: चालक- सलीम अन्सारी, रा. गादी, जि. कोडरमा, राज्य- झारखंड याने दि. 24.08.2020 रोजी 14.45 वा. सु. ट्रक क्र. आर.जे. 14 जीडी 5869 हा मौजे कोराळ मोडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर निष्काळजीपणे चालवून मोटारसायकला धडक दिली. यात मो.सा. वरील राजेंद्र फुगटे, रा. मुरुम व लालासाहेब वाघमारे, दोघे रा. माकणी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या राजेंद्र फुगटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 25.08.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.

पोलीस ठाणे, बेंबळी: कुंडलिक अर्जुन कोळगे, रा. केशेगांव, ता. उस्मानाबाद व त्यांचे शेजारी- मनोज सदाशिव चिखले अशा दोघांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 24.08.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील सोन्याचे दागिने, एलसीडी टीव्ही, गृहउपयोगी भांडी व किराणा सामान असा एकुण 73,500/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या कुंडलिक कोळगे यांनी दि. 25.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): जयंत चंद्रकांत कदम, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 23.08.2020 रोजी 11.30 वा. येडशी शिवारातील येडशी- लातुर रस्त्यालगत होंडा युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 2797 ही लावली होती. ती त्यांना लावल्या ठिकाणी 16.00 वा. आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या जचंत कदम यांनी दि. 25.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top