“नाकाबंदी दरम्यान 164 कारवाया- 32,900 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 28.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 164 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 32,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.
“होम क्वारंटाईन व्यक्तीचा सार्वजनिक वावर, डॉक्टरांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, लोहारा: आरोग्य सेवक- रविकुमार बाळु मोकाशे, रा. लोहारा हे कोविड- 19 संसर्गग्रस्त आढळल्याने त्यांच्यावर दि. 14 ते 25.08.2020 या काळात उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना पुढील दहा दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगीतले असतांनाही ते दि. 26.08.2020 रोजी 08.00 वा. सु. लोहारा शहरात सार्वननिक ठिकाणी फिरले. अशा प्रकारे त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण केली. यावरुन आरोग्य अधिकारी- डॉ. अशोक कठारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: अभिजीत विजयकुमार बोधणे, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर यांनी टीव्हीएस स्टार सिटी मो.सा. क्र. 13 7589 ही दि. 27.08.2020 रोजी आपल्या घरा समोर लावली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अभिजीत बोधणे यांनी दि. 29.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“खुन.”
पोलीस ठाणे, परंडा: श्रीमती सारिका हरिश्चंद्र जाधव, रा. सरणवाडी, ता. परंडा यांच्याकडे त्यांची आई- लक्ष्मी दादा क्षिरसागर, रा. मानकेश्वर, ता. भुम या पाहुण्या आल्या होत्या. दि. 28.08.2020 रोजी सारिका या आपली मुले- समाधान व ऋतुजा यांना सोबत घेउन आईसह पुणे येथे जाण्याच्या तयारीत होत्या. तसे करण्यास पती हरिश्चंद्र भिमराव जाधव यांनी पत्नी- सारिकास विरोध केला. तो विरोध पत्नी सारिका हिने न जुमानल्याने चिडुन जाउन हरिश्चंद्र जाधव यांनी सायंकाळी 16.45 वा. सु. कुऱ्हाडीने पत्नी- सारिका व सासु- लक्ष्मी यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खुन केला. अशा मजकुराच्या राहुल दादा क्षिरसागर, रा. मानकेश्वर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.
“शेतजमीनीवर अतिक्रमन करणाऱ्या भाऊबंदांवर गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, उमरगा: धन्नु मोतीराम राठोड, वय 65 वर्षे, रा. औराद, ता. उमरगा यांच्या शेतात दि. 26.05.2020 रोजी भाऊबंद- गोविंद व पांडुरंग विठ्ठल राठोड या दोघा भावांनी कडबा, सरपन आनुन टाकले. ते साहित्य काढून घेण्यास धन्नु राठोड यांनी त्यांना वेळोवेळी विनवण्या केल्या. यावर त्यांनी धन्नु यांना शिवीगाळ करुन “हे शेत आमच्या मालकीचे असुन साहित्य काढणार नाही.” असे धमकावले. अशा मजकुराच्या धन्नु राठोड यांनी दि. 28.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): उमरगा शहरातील बौध्दनगर येथे दि. 27.08.2020 रोजी 19.00 वा. सु. 1)अमर चिलवंत 2)सम्यक चिलवतं 3) पृथ्वीराज चिलवंत 4)सचिन चिलवंत 5)सिद्दोन शिंगाडे 6) रावसाहेब शिंगाडे 7) अक्षय शिंगाडे 8) बुध्दमणी शिंगाडे 9) बंटी शिंगाडे 10) विकी खुणे, सर्व रा. बौध्दनगर, उस्मानाबाद यांच्या गटाचा गल्लीतीलच- 1) राणा बनसोडे 2) राहुल बनसोडे 3) बाळा बनसोडे 4) अजय बनसोडे 5)रोहन बनसोडे 6) रोहित बनसोडे 7) अविनाश बनसोडे 8) समर्थ शिंदे 9) रोहन शिंदे यांच्या गटाशी मागील भांडणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी एकमेकांस शिवीगाळ करुन तलवार, कुऱ्हाड, लोखंडी गज, फरशी- दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
यावरुन दोन्ही गटांतील सदस्यांनी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 326, 452, 143, 147, 148, 149, 323, 324, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): योगीराज विलास मोरे, रा. समतानगर, उस्मानाबाद व त्यांचा चुलत भाऊ असे दोघे दि. 28.08.2020 रोजी 21.30 वा. सु. कारने येडशी- उस्मानाबाद प्रवास करत होते. दरम्यान येडशी टोलनाका ओलांडताना योगीराज मोरे हे अनावधानाने फास्ट टॅग साठी राखीव असलेल्या टोल बूथवर कार घेउन गेले. त्याकारणावरुन त्यांचा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला यातून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी योगीराज मोरे यांस्ह त्यांच्या भावास शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या योगीराज मोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 147, 148, 149, 504 अन्वये गुन्हा दि. 29.08.2020 रोजी नोंदवला आहे.