छत्रपती शिवाजी मित्र मंडळ गणेशोत्सवा निमित्त रक्तदान रक्तदान शिबिर

0

उस्मानाबाद , सांगवी (का) :-   प्रतिनिधी (भिमा भूईरकर). तुळजापूर तालुक्यातील सांगवी (का) येथे छत्रपती शिवाजी मित्र   मंडळाच्या वतीनेआपले लाडके दैवत श्री गणेश मूर्तीची पूजा करून मंडळाचे  अध्यक्ष उमेश रघुनाथ रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८/०८/२०२०   भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व गणेशभक्तांनी लाख मोलाचे योगदान दिले यावेळी महिला प्रियदर्शनी महेश पाटील, वर्षा नानासाहेब पाटील, यांनी ही रक्तदान केले तसेच दिवसभरात एकुण
४० रक्तदात्यानी रक्तदान करुन सहकार्य केले.श्रीमती गोपाबाई दमानिया ब्लड बँक सोलापूर यांनी रक्त संकलन केले. सकाळी ९:००ते २:००रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये मंडळाच्या सर्व सदस्यांनी व गावातील नागरिकांनी रक्तदान केले रक्तदान केल्यानंतर त्यांना तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष उमेश रोकडे, मंडळाचे आधारस्तंभ महेश पाटील, पिंटू पाटील, नानासाहेब पाटील, रामदास मगर, विष्णू मगर, धनाजी परीट, श्रीकांत कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top