उस्मानाबाद :- सांगवी (का) प्रतिनिधी(भिमा भूईरकर).
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी मिलिंद मगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मागील उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. 28 /०8/ 2020 रोजी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपचे मिलिंद मगर यांची नुतुन उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक अधिकारी के.बी भांगे ,अतिरिक्त ग्रामसेवक बापूराव दराडे, सांगवी (का) गावचे तलाठी अशू राजमाने, माझी उप सरपंच लक्ष्मण माळी, ग्रामपंचायत सदस्य राधा रवी मगर, माझी सरपंच तथा चालू सदस्य नागनाथ मगर,राधा रवी मगर, ग्रामपंचायत सदस्य सरस्वती लक्ष्मण मगर, ग्रामपंचायत शिपाई रघुनाथ मगर, ग्रामपंचायत ऑपरेटर अमित मगर ,ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई महादेव माळी , मधुकर मगर, अंकुश मगर,व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते