53 गावांचा एकच सार्वजनिक गणपती भुम पोलीस ठाण्यासमोर स्थापन.”
पोलीस ठाणे, भुम: कोविड- 19 संसर्गामुळे सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्याच अनुशंगाने
जिल्ह्यातील खेडे गावांत ‘एक गाव- एक गणपती’ तर शहरात ‘एक वॉर्ड- एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रबोधन करण्याचा निर्णय मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी घेतला. त्यानुसार पोलीस ठाण्यांनी सार्वजनिक मंडळे, ग्रामसुरक्षा दल यांच्यासोबत 350 हुन अधिक बैठकी घेउन त्यांचे प्रबोधन केले.
*उस्मानाबाद शहरात आठव्या मोहल्ला क्लीनीकचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते....
भुम पोलीस ठाणे हद्दीत भुम शहरासह एकुण 53 गावे आहेत. या सर्व गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे, भुम पो.ठा. चे पोनि- श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि- मंगेश साळवे यांच्यासह भुम पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पेलली. यातूनच या सार्वजनिक गणेश मंडळांशी 53 गावांचा एकच सार्वजनिक गणपती भुम पोलीस ठाण्यासमोर स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
*उस्मानाबाद जिल्ह्यात शानिवारी दि 22/08/2020 रोजी 200 कोरोना रुग्णाची वाढ !
आज दि. 22.08.2020 रोजी 16.00 वा. या सार्वजनिक गणपतीची स्थापना मा. पोलीस अधीक्षक सो. यांच्या हस्ते पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळांचे सदस्य हजर होते. गणेशोत्सव काळात या गणपतीच्या सकाळ- संध्याकाळ आरती, देखभालीसाठी गणेश मंडळांना जबाबदारी वाटुन देण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात या मंडळांतर्फे प्रतीदिनी जनजागृती, रक्तदान, वृक्षारोपन, गरजुंना अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर- मास्क वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
या अनोख्या उपक्रमाबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी भुम पो.ठा. चे अधिकारी- कर्मचारी व 53 गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांचे कौतुक करुन त्यांचा आदर्श समाजास प्रेरणादायी ठरेल असा आशावाद व्यक्त केला आहे.
(कार्यक्रम प्रसंगी मास्क- सॅनिवाटायझर वाटपाचे छायाचित्र.)