उस्मानाबाद जिल्ह्यातील आज दाखल झालेले गुन्हे व पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाया..

0


 “
नाकाबंदी दरम्यान 112 कारवाया- 24,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 22.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 112 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 24,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

 

मनाई आदेशांचे उल्लंघन 8 व्यक्तींकडून प्रत्येकी 200 ₹ दंड वसुल.

उस्मानाबाद जिल्हा: सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर राखण्यासंबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल दि. 22.08.2020 रोजी 8 व्यक्तींकडून प्रत्येकी 200/-रु. दंड वसुल केला आहे.

 

 “अवैध मद्य विरोधी कारवाया.

पो.ठा. लोहारा: संतोष शंकर थोरात, रा. धानुरी ता. लोहारा हा दि. 22.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,000/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.

पो.ठा. वाशी: आक्काबाई लक्ष्मण काळे, रा. पारधीपिढी, गोलेगाव, ता. वाशी या दि. 23.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर दारुचा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 15 लि. गावठी दारु (किं.अं. 950/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळल्या.

यावरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द पोलीसांनी म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 

चोरी.

पोलीस ठाणे, वाशी: संजय प्रतापराव साळुंके, रा. वाशी, यांच्या वाशी शिवारातील ‘प्रताप ॲटोलाईन्स पेट्रोल- डिझेल’ या पेट्रोलियम विक्री केंद्राच्या टाकी मधील 3,830 लि. डिझेल (किं.अं. 3,05,748/-रु.) दि. 11.08.2020 ते 21.08.2020 या कालावधीदरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या व्यवस्थापक- तुकाराम ज्ञानोबा विर, रा. शेंडी, ता. वाशी यांनी दि. 22.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): गोकुळ सुर्यभान बनसोडे, रा. सुर्डी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 21.08.2020 रोजी राहत्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 1108 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या गोकुळ बनसोडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

सुनेचा छळ, गुन्हा दाखल.

पोलीस ठाणे, परंडा: अंजली गणेश पाटुळे, रा. आष्टावाडी, ता. भुम या माहेरहुन पैसे आनत नसल्याच्या कारणावरुन 1)गणेश आप्पासाहेब पाटुळे (पती) 2) राजामाती पाटुळे (सासु) 3)आप्पासाहेब पाटुळे (सासरा) 4)अविनाश पाटुळे (दिर) 5)उमेश पाटुळे (दिर) सर्व रा. आरसोली, ता. भुम या सर्वांनी अंजली यांचा सन- 2019 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच माहेरहुन पैसे आनल्याशिवाय नांदवणार नसल्याचे धमकावले. अशा मजकुराच्या अंजली पाटुळे यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 22.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 

लैंगीक अत्याचार.

उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील एका खेडेगावातील 22 वर्षीय तरुणीस (नाव- गाव गोपनीय) एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दि. 13.08.2020 रोजी तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच त्या तरुणीने अन्य व्यक्ती सोबत लग्न केल्यास तीला व तीच्या कुटूंबीयांस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दि. 22.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2)(एन), 341, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

अपघात.

पोलीस ठाणे, मुरुम: आनंद रमाकांत कुलकर्णी, रा. कंटेकुर, ता. उमरगा व बहीण- मनीषा श्रीराम देशपांडे, वय 36 वर्षे, रा. कोरेगाव, ता. उमरगा हे दोघे मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 1761 ने दि. 29.06.2020 रोजी 09.00 वा. मुरुम- कंटेकुर जात होते. दरम्यान कंटेकुर शिवारातील पुलावर आनंद यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे, हयगईने चालवल्यामुळे पाठीमागे बसलेल्या मनीषा देशपांडे या खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागुन उपचारादरम्यान त्या मयत झाल्या. अशा मजकुराच्या श्रीराम मनोहरराव देशपांडे (मयताचे पती) यांनी दि. 22.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह  मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहाण.

पोलीस ठाणे, तामलवाडी: मौजे नांदुरी, ता. तुळजापूर येथील गणेश सुरवसे व खंडु मुळेकर या दोन्ही कुटूंबीयांत दि. 22.08.2020 रोजी 19.00 वा. सु. किरकोळ कारणावरुन भांडणे झाली. यात परस्परविरोधी कुटूंबीयांस लाथाबुक्यांनी, दगड, विटांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंब सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 2 स्वतंत्र गुन्हे भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये नोंदवण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top