“सार्वजनिक गणेश मंडळांना मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांचे आवाहन.”

0


उस्मानाबाद जिल्हा: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आज दि. 17.08.2020 रोजी पोलीस मुख्यालयात मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी वार्ताहर परिषद घेतली. यात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्या संबंधी महाराष्ट्र शासनाने दि. 11.07.2020 रोजी काढलेल्या पत्रकाची माहिती दिली. कोविड- 19 साथीमुळे गर्दीचे कार्यक्रम- उत्सव, यात्रा यावर मर्यादा आल्या असुन अनेक गावच्या यात्रा- उत्सव जनतेने स्वयंस्फुर्तीने रद्द केल्या आहेत. त्या अनुशंगाने पोलीस प्रशासनाकडून पोलीस ठाणे स्तरावर तसेच गा्रम पातळीवरील सार्वजनिक गणेश मंडळे, शांतता समिती, ग्रामसुरक्षा दल, कोरोना वॉरियर्स व स्थानिक प्रशासन यांच्याशी संपर्क साधुन 350 हुन अधिक बैठकांचे आयोजन केले आहे.

या जनसहभागातूनच पो.ठा. उस्मानाबाद (श.)- 7, आनंदनगर- 1, तामलवाडी- 6, उमरगा- 3, लोहारा- 2, कळंब- 9, ढोकी- 2, येरमाळा- 2 अशा 32 गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवनार असल्याची माहिती काल दि. 16.08.2020 रोजी पर्यंत पोलीस प्रशासनास दिली आहे. तर खेडे गावांत ‘एक गाव- एक गणपती’ तर शहरात ‘एक वॉर्ड- एक गणपती’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय 105 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. मंडळांनी घेतलेल्या या लोकाभिमुख निर्णयाबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी त्या मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले असुन उर्वरीत मंडळांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top