गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा - पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे.

0

उस्मानाबाद , जिल्ह्यातील  सांगवी (का):(प्रतिनिधी , भिमा भूईरकर )

कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा व प्रशासनाने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान तामलवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी सुरतगाव येथे झालेल्या बैठकीत बोलताना सांगितले.


*सर्वप्रथम तामलवाडी पोलीस स्टेशनचे नुतून पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांचा सत्कार करण्यात आला

या वर्षाचा गणेशोत्सव 22 ऑगस्ट पासून सुरू होत आहे मात्र या वर्षाच्या गणेशोत्सवावर कोरोना महामारी चे सावट आहे तसेच राज्य सरकारने यावर्षीचा गणेशोत्सव भक्तांनी साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे. तसेच गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातलेली आहे कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 17/ 8/ 2020 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी च्या वतीने सोशल डिस्टंनसिंगपालन करत सुरतगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. 



या कार्यक्रमास तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जामदाडे, सुरतगावचे उपसरपंच विठ्ठल गुंड, बीट अंमलदार गोरोबा गाढवे, राठोड साहेब, सुरतगावचे पोलीस पाटील प्रवीण कुंभार, बापूराव गुंड, अनिल गुंड, नागेश मगर, राजकुमार गुंड, येथे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top