उस्मानाबाद : जिल्हाधिकारी पदी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली नियुक्ती झाली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात गुरुवारी (ता.२०) आदेश काढले आहेत. पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी यापूर्वी लातूर येथे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. याशिवाय जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामाचा अनुभव आहे.
त्यांचे शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालयातून झाले असून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठी विषयामध्ये झालेले आहे. त्यांचे मूळगाव लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे आहे.
कौस्तुभ दिवेगावकर यांच्या 2013 मध्ये भारतात यूपीएससीच्या निकाल मध्ये पंधरावा क्रमांक व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक होता
गेल्या अनेक वर्षांच्या खंडानंतर जिल्ह्याला याच परिसरातील जिल्हाधिकारी मिळाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे सावट आहे. ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याचे मोठे आवाहन त्यांच्यावर असणार आहे.
उस्मानाबाद शेजारील लातूर जिल्ह्यातील माझे मूळगाव असून येथील भूमीपुत्र आहे. उस्मानाबादच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, अशी भावना त्यांनी `एका प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे.