उस्मानाबाद - महाज्योती बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाज्योतीचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे करण्यात बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
विमुक्त जाती भटक्या जमाती (VJ &NT), इतर मागासवर्गी (OBC),विशेष मागसप्रवर्ग (SBC) यामधील तरुण युवक - युवती च्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 8 ऑगस्ट 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र वर्ष लोटून ही कार्यन्वित मात्र झाली नव्हती त्यासाठी महाज्योती बचाव कृती समिती ने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने दि 11 ऑगस्ट 2020 रोजी महाज्योती या संस्थेचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आलं आहे .. त्यासाठी महाज्योती या संस्थेच मुख्य कार्यालय हे राज्याच्या मध्यवर्ती म्हणजे औरंगाबाद येथे करण्यात यावे.
औरंगाबाद हे राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना महाज्योती च्या सर्व योजनांचा लाभ घेण्यास सोईस्कर होईल त्यामूळे महाज्योती या संस्थेच मुख्य कार्यलाय हे औरंगाबाद येथे करण्यात यावे असे उल्लेख निवेदनात करण्यात आले आहे..
या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष बळीराम चव्हाण, राज्य उपाध्यक्ष किरण बनसोडे व राज्य सचिव प्रविण राठोड यांंच्या स्वाक्षऱ्या आहेत