“बेवारस आढळलेले ते तेलगु भाषीक बहिण- भाऊ बालगृहातून पुन्हा बेपत्ता.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: उमरगा चौरस्ता येथे दि. 15.08.2020 रोजी 4 बालके उमरगा पोलीसांना आढळली होती. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील ‘अपना घर’ या बालगृहात ठेवले होते. यातील कावेरी पेदापल्लीगेनू, वय 12 वर्षे, व तीचा भाऊ- नानीसेनू पेदापल्लीगेनू, वय 8 वर्षे हे दोघे बहिण- भाऊ दि. 18.08.2020 रोजी बालगृहातून परस्पर निघुन गेले होते. अक्कलकोटचया दिशेने पायी जाणाऱ्या या दोघा बहिण- भावास पोलीसांनी त्याच दिवशी अवघ्या 8 तासांत शोधुन पुन्हा अपना घर येथे दाखल केले होते.
हे दोघे बहिण- भाऊ दि. 23.08.2020 रोजी 15.30 वा. सु. ‘अपना घर’ मधून पुन्हा बेपत्ता झाले आहेत. हि बालके आढळल्यास नजीकचे पोलीस ठाणे किंवा अपना घर, नळदुर्ग येथे कळवावे. असे आवाहन उस्मानाबाद पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. (बेपत्ता बहिण- भावाचे छायाचित्र.)
“खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.”
स्थानिक गुन्हे शाखा: मौजे बुकनवाडी, ता. उस्मानाबाद येथील सुरेश काळे याचा दि. 19.08.2020 रोजी 13.00 वा. सु. गावातील लोहमार्गा जवळील गायराण शेतात दोरीने गळा आवळुन खुन झाला होता. तसेच त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी आरोपींनी त्याच्या प्रेतास गळफास लावून लिंबाच्या झाडास लटकवले होते. अटकेच्या भितीने या गुन्ह्यातील आरोपींनी गावातून पलायन केलेले आहे. यापैकी एक आरोपी- अंकुश इंद्रजीत बुकन, रा. बुकनवाडी, ता. उस्मानाबाद यास स्था.गु.शा. च्या सपोफौ- खोत, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, पोकॉ- आरसेवाड, सर्जे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काल दि. 24.08.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी पो.ठा. ढोकी यांच्या ताब्यात दिले आहे.
“नाकाबंदी दरम्यान 238 कारवाया- 54,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 24.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 238 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 54,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.
“मनाई आदेशांचे उल्लंघन 24 पोलीस कारवायांत 5,100/-रु. दंड वसुल.”
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 23 व 24.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 23 कारवायांत- 4,600/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 1 कारवाईत 500/-रु. दंड प्राप्त.
“व्यायामशाळेतील साहित्य संशयीतरित्या बाळगणाऱ्यावर कारवाई.”
पोलीस ठाणे, उमरगा: मल्टीजिम (आधुनिक व्यायामशाळा) मधील साहित्य उमरगा तालुक्यातील कुन्हाळी शिवारात बळी बब्रुवान एरडे, यानेआपल्या शेतात ठेवले असल्याबाबतची गोपनीय खबर पो.ठा. उमरगा यांच्या पथकास मिळाली. यावर पथकाने दि. 24.08.2020 रोजी 16.00 वा. बळी एरडे याच्या शेतात जाउन खात्री केली असता त्याच्या कब्जात बिईग ट्रिग फिटनेस इक्युपमेंट्स कंपनीचे व्यायामशाळा साहित्य (कि.अं. 4,00,000/-रु.) मिळुन आले. बळी एरडे हा त्या साहित्याची मालकी शाबीत करु न शकल्याने व पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने नमूद साहित्य जप्त करुन बळी एरडे यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 124 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
“उपचारादरम्यान पलायन करणाऱ्या कोविड- 19 च्या रुग्णावर गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे, कळंब: गणेश विष्णु टेकाळे, रा. पिंपळगांव (डोळा), ता. कळंब हे कोविड- 19 संसर्गग्रस्त असल्याने त्यांच्यावर आयटीआय-कळंब येथील कोविड सेंटर मध्ये उपचार चालू होते. उपचारादरम्यान दि. 24.08.2020 रोजी दुपारी ते तेथून परस्पर निघून गेले. अशा प्रकारे त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण केली. यावरुन पोलीस नाईक- भारत पाठक, यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“जुगार विरोधी कारवाया.”
पोलीस ठाणे, कळंब: विजयकुमार आश्रुबा राखुडे, रा. खडकी, ता. कळंब हा दि. 24.08.2020 रोजी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,150/-रु. बाळगलेला पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, वाशी: समाधान पंडीतराव क्षिरसागर, रा. वाशी हा दि. 24.08.2020 रोजी पारा येथील चिरकाड वस्तीवर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 600/-रु. बाळगलेला पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, परंडा: जिलानी दिलदार मनियार, रा. समतानगर, परंडा हा दि. 24.08.2020 रोजी परंडा येथील चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 470/-रु. बाळगलेला पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, आनंदनगर: मच्छिंद्र विश्वनाथ रणखांब, रा. शिवनेरीनगर, उस्मानाबाद हा दि. 24.08.2020 रोजी उस्मानाबाद येथील नगरपालीका गाळ्यात मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 540/-रु. बाळगलेला पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, मुरुम: 1)रामलिंग बसलिंग अंबुसे 2)राजेंद्र मारुती कांबळे, रा. मुरुम हे दोघे दि. 24.08.2020 रोजी अशोक चौक, मुरुम येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 7,430/-रु. बाळगलेले तर त्याच दिवशी मुरुम येथील 1)कृष्णा संजय हानचाटे 2)राम बाबुराव कदम 3)सुदर्शन हणमंत औताडे हे तीघे महादेवनगर, मुरुम येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह रोख रक्कम 11,480/-रु. बाळगलेले पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले.
यावरुन वर नमूद 9 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 6 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
“चोरी.”
पोलीस ठाणे, भुम: अविनाश राम तावरे, रा. गोरमाळा फाटा, ता. भुम यांनी दि. 19.08.2020 रोजी घरासमोर लावलेली होंडा युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच. 13 बीटी 2775 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अविनाश तावरे यांनी दि. 24.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
पोलीस ठाणे, वाशी: ट्रक क्र. एम.पी. 09 एचएच 4187 च्या अज्ञात चालकाने दि. 23.08.2020 रोजी 09.30 वा. सु. मौजे पारगांव येथील रस्त्यावर ट्रक निष्काळजीपणे चालवून समोरील मो.सा. क्र. एम.एच. 13 बीएल 5509 ला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील सुनिल संतोष शिंदे, रा. गिरवली, ता. भुम व त्यांचे आजोबा- गंगाराम लक्ष्मण फुलवरे हे दोघे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सुनिल शिंदे यांनी दि. 24.08.2020 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: राणी राम गायकवाड, रा. दिंडेगांव, ता. तुळजापूर यांसह त्यांचे पती व नातलग- विश्वंभर क्षिरसागर, कलावती क्षिरसागर, सुनिता गायकवाड, लक्ष्मण गायकवाड हे सर्वजण दि. 23.08.2020 रोजी 22.00 वा. आपल्या राहत्या घरी होते. यावेळी गावातील नातेवाईक- महावीर क्षिरसागर, सोपान क्षिरसागर, मारुती क्षिरसागर, कविता क्षिरसागर अशा चौघांनी राणी गायकवाड यांच्या घरी जाउन लग्नासंबंधीच्या वादावरुन नमूद 6 जणांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राणी गायकवाड यांनी दि. 24.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 452, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, शिराढोण: राजेंद्र लोंढे, अशोक लोंढे, सुरज लोंढे, बंटु लोंढे, चौघे रा. लोहटा (प.), ता. कळंब अशा चौघांनी दि. 18.07.2020 रोजी 11.00 वा. सु. हिंगणगावातील समाज मंदीरासमोर मागील भांडणाची कुरापत काढून गयाबाई भिमराव वाघमारे, रा. हिंगणगांव, ता. कळंब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या गयाबाई वाघमारे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 24.08.2020 रोजी नोंदवला आहे.