मोटार वाहन कायदा अंतर्गत 65 कारवाया- 12,200 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”
उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 24.10.2020 रोजी जिल्ह्यातील18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 65 कारवाया करुन 12,200 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.
“उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने अवैध मद्य विरोधी केली कारवाई.”
स्थानिक गुन्हे शाखा: राजु बाबुराव चव्हाण, रा. गोंधळवाडी, तुळजापूर हा दि. 24.10.2020 रोजी तामलवाडी येथील लक्ष्मण बंडगर यांच्या मोकळ्या जागेसमोर 15 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या 28 बाटल्या (एकुण किं.अं. 4,980/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द तामलवाडी पो.ठा. येथे म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
(तामलवाडी शिवारातील अवैध मद्य छाप्याचे छायाचित्र.)
“लैंगीक अत्याचार.”
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील तरुणाने गावातीलच एका 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे अमिष दाखवून तीच्याशी लैंगीक संबंध ठेवल्याने ती मुलगी गरोदर झाली आहे. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पित्याने दि. 24.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2), 376 (आय), आणि पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
उस्मानाबाद जिल्हा: एक तरुण गावातीलच एका 18 वर्षीय तरुणीचा (नाव- गाव गोपनीय) मागील काही महिन्यांपासून पाठलाग करुन एकांतात तीला भेटण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तीच्या घरच्या मोबाईल फोनवर संदेश करुन तीला बोलण्याची सक्ती करत होता. या होत असलेल्या मानसिक त्रासास कंटाळून दि. 23 ते 24.10.2020 रोजीच्या रात्री त्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या मयत तरुणीच्या पित्याने दि. 24.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी.”
पोलीस ठाणे, मुरुम: रमेश फुलचंद कागे, रा. येणेगुर, ता. उमरगा व त्यांची पत्नी- रेणुका व आई- कमलाबाई असे तीघे दि. 24.10.2020 रोजी 02.45 वा. सु. राहत्या घरी झोपलेले होते. यावेळी 25 ते 35 वयोगटातील तीन अनोळखी पुरुषांनी रमेश कागे यांच्या घराचा कडी- कोयंडा तोंडून त्या तीघांपैकी एकजण बाहेर थांबला व दोघे घरात येउन रमेश कागे यांसह त्यांच्या पत्नीस टामीने मारुन जखमी केले व चाकुचा धाक दाखवुन रेणुका व कमलाबाई यांच्या अंगावरील दागिन्यांसह कपाटातील 28 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 10,000/-रु. असा एकुण 97,000/-रु. चा माल जबरीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या रमेश कागे यांनी दि. 24.10.2020 रोजी 18.30 वा. सु. दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: दिपक खंडाळे, रा. झिंगाडे प्लॉटींग, लोहारा हे दि. 24.10.2020 रोजी राहत्या घरी झोपलेले असतांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने मध्यरात्री 01.45 वा. सु. गुपचूपपणे तोडून आतील दागिन्याची पेटी घराबाहेर नेउन पेटीचा कडी- कोयंडा तोडून आतील 7.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व रोख रक्कम 11,000/-रु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या दिपक खंडाळे यांनी दि. 25.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: गोवर्धन प्रल्हाद पवार, ठाकरे नगर, उस्मानाबाद यांच्या राहत्या इमारतीतील खालच्या मजल्यावरील दरवाजा नसलेल्या खोलीतील सोयाबीनचे 8 पोती प्रत्येकी 60 कि.ग्रॅ. वजन असलेली दि. 24.10.2020 रोजी 02.00 ते 03.00 वा. चे दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहेत. अशा मजकुराच्या गोवर्धन पवार यांनी आज दि. 25.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: सुधीर भिमराव वाकुरे, रा. आनंदनगर, उस्मानाबाद व त्यांचा मित्र असे दोघे दि. 25.10.2020 रोजी उस्मानाबाद- तुळजापूर असा पायी प्रवास करत होते. दरम्यान रात्री 02.00 वा. सु. बोरी येथील पेट्रोलियम विक्री केंद्रा जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर एका मोटारसायकलवर तीन अनोळखी पुरुषांनी येउन सुधिर वाकुरे यांसह त्यांच्या मित्रास धमकावून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन सुधीर यांच्याजवळील ॲपल 11 मॅक्स प्रो. मोबाईल फोन (किं.अं. 50,000/-रु.) हिसकावून घेउन निघुन गेले. अशा मजकुराच्या सुधिर वाकुरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
पोलीस ठाणे, उमरगा: चालक- नितीन प्रभाकर नागोबा, रा. मुरुम, ता. उमरगा याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 1332 ही दि. 19.10.2020 रोजी 13.30 वा. सु. कराळी फाटा येथे निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडत असणाऱ्या प्रिती गोविंद वडदरे, वय 11 वर्षे, रा. कराळी, ता. उमरगा हिस धडक दिली. या अपघातात प्रिती हिचा उजवा पाय मोडल्याने ती गंभीर जखमी झाली. अशा मजकुराच्या गोविंद सम्रथी वडदरे यांनी दि. 24.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन ठिकाणी मारहाण.”
पोलीस ठाणे, आंबी: शेतीच्या कारणावरुन भांडणे व गैरसमज वाढवल्याचा संशय धरुन दि. 21.10.2020 रोजी 22.30 वा. सु. गावकरी- लहु लिंबा गायकवाड यांना त्यांच्या राहत्या घरासमोर 1) शिवलींग अरुण भोजने 2)रामलिंग भोजने 3) जया भोजने, तीघे रा. कंडारी, ता. परंडा यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लहु गायकवाड यांनी दि. 24.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 34 आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: योगेश सोमनाथ बामणकर, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर यांनी त्यांचे सोयाबीन पिक वाहुन नेताना भाऊबंद- महेश नवनाथ बामणकर यांच्या शेतातील उसाच्या पिकाचे नुकसान झाले होते. याचा राग मनात धरुन महेश बामणकर यांसह नवनाथ बामणकर, विजयाबाई बामणकर, मयुरी बामणकर यांनी दि. 22.10.2020 रोजी 21.00 वा. सु. राहत्या गल्लीत योगेश बामणकर यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या तुंबा, लोखंडी सळई, काठीने मारहाण करुन जखमी केले. मुलास वाचवण्यास आलेल्या सोमनाथ बामणकर यांनाही नमूद चौघांनी काठीने मारहाण करुन त्यांचा हात मोडला. अशा मजकुराच्या योगेश बामणकर यांनी दि. 24.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: सुदाम नागनाथ शिंदे, रा. येवती, ता. तुळजापूर हे दि. 08.09.2020 रोजी 15.30 वा. सु. चिवरी शिवारातील शेतातील सामाईक बांधावरुन जनावरे घेउन जात होते. यावेळी भाऊबंद- भगवान गेनदेव शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णात शिंदे यांनी सुदाम शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन सुदाम यांचा डावा हात मोडला. मुलास वाचवण्यास आलेल्या गोदाबाई शिंदे यांनाही नमूद तीघांनी लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुदाम शिंदे यांनी काल दि. 24.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.