उस्मानाबाद :- राज्यावरती कोरोना वायरसचे संकट असुन यातच पावसाच्या पाण्याने जनजीवन विस्कळित झाले आहे, शेतकऱ्यांचे अफाट नुकसान झाले असून परत एकदा शेतकरी संकटात सापडला आहे, नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्यासाठी राज्य केंद्र शासन प्रशासन गंभीर असून मोलमजुरी करणा-या असंघटित संघटित बांधकाम कामगारांना ही तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे.
पावसामुळे काहिंच्या घरांना तडे गेले असुन अशांची देखिल सुक्ष्म पंचनामे झाले पाहिजेत.नोंदित कामगारांना कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात कामगार कल्याणकारी मंडळाकडून पाच हजार रुपये ची मदत झाली परंतु हि मदत अनेकांना मिळाली नाही.आज फुटपाथवर अनेक जण लघु उद्योगातुन उपजिविका मागवितात,चहा विक्रेते,पान टपरीवाले,चपला शिवणारे, पुस्तक कपडे विकणारे,पिग्मी एजेंट, तहसिल कार्यालय व इतर शासकीय कार्यालय परिसरात स्टंम्प पेपर,अर्ज लिहून देणारे, सुशिक्षित बेरोजगार ते नोंदित घरेलु महिला कामगार अशा कडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.ज्या प्रमाणे शेतकरी जगला पाहिजे त्यिच प्रमाणे कामगारहि जगला पाहिजे आणि यांना जगविणे शासनाचे कर्तव्य आहे.
कोरोना मुळे अथवा पावसाच्या पुरात, नैसर्गिक आपत्तीत बांधकाम कामगार व शेतकऱ्यांचे निधन झाल्यास त्यांना पन्नास लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण तात्काळ लागु करुन संघटित असंघटित बांधकाम कामगारांना व अन्य इतर लघु उद्योगातुन उपजिविका भागविण्या-या कामगारांना ओला दुष्काळाच्या धर्तीवर तातडीची मदत म्हणुन प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत करण्यासाठी उस्मानाबाद उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मा.कौस्तुभजी दिवेगावकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांनी लेखी निवेदन दिले.निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त गणेश रानबा वाघमारे, सामाजिक कार्यकर्त फेरोजखान पठाण, अविनाश नन्नवरे,संजय गजधने, राहुल राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.