google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्हयात शारदीय नवरात्रेत्सव सणानिमित मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद जिल्हयात शारदीय नवरात्रेत्सव सणानिमित मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

0


उस्मानाबाद जिल्हयात शारदीय नवरात्रेत्सव सणानिमित मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे     -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

 

         उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- महाराष्ट्रात बहुतांश भागात कोरोना(कोविड 19) या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत असून, कोरोना (कोविड 19) या संसर्गजन्य आजार असल्याने उस्मानाबाद जिल्हयात शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत करोना (कोविड-19) विषाणूंचा मोठया प्रमाणावर फैलाव होवू शकतो. कोरोना विषाणुचा फैलाव वाढु नये. यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

         जिल्हादंडाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, यांनी  भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियिम 1897 मध्ये नमूद अधिकारानुसार  दि.15 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 01.00 वाजेपासून ते 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वाजेपावेतो उस्मानाबाद जिल्हयामध्ये पूढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.

 तुळजापूर शहरामध्ये यात्रेकरीता/दर्शनाकरीता बाहेरील नागरीक व वाहनांना प्रवेश करण्यास दिनांक अधिकारानुसार  दि.15 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 01.00 वाजेपासून ते 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वाजेपावेतो मनाई करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्याचे बाहेरील जिल्यातून व इतर राज्यातून तुळजापूर व येरमाळा येथील येडेश्वरी तसेच अन्य यात्रांकरीता येणा-या नागरीकांना व वाहनांना दिनांक दि.15 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 01.00 वाजेपासून ते 31 ऑक्टोंबर-2020 रोजीचे 12.00 वाजेपावेतो मनाई करण्यात येत आहे.

 महाराष्ट्र शासनाने निर्गनात गेलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्हयातील धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे शासनाने पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी बंद राहतील. सार्वजनिक

मेळावे व समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील. गरवा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई करण्यात येत आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराने गांभीर्य लक्षात घेवून श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजागवानी देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव 2020 हा अत्यंत साधेपणाने साजरा करणे बंधनकारक असेल.

          या कालावधीत भक्तांना व भाविकांना दर्शनासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात वाहनाने

अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता तुळजापूर शहरातील जनतेस किंवा भाविकांस महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या कालावधीमध्ये भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास. भाविकास श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहेत. श्रीदेवीजींचे शारदीय नवरात्र महोत्सवात पुर्वापार प्रथेप्रमाणे येणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजेसाठी आवश्यक असणारे पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. सदर परवानगी उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय पोलिस अधिकारी ,तुळजापूर व मंदिर तहसिलदार यांच्या मान्यतेने देण्यात येईल.

कोरोना कोविड-19 या विषाणुचा प्रसार होवू नये. म्हणून सदर कालावधीत मंदिर

संस्थानकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा तपासणीसाठी अवलंब केला जाणार आहे. दैनंदिन निर्जतुकीकरण, सामाजिक अंतराचे पालन, तोंडाला मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सदर कालावधीत मंदिरात व मंदिर परिसरात मद्यपान, पान, तंबाखू, गुटखा इत्यादी तत्सम पदार्थाचे सेवन करता येणार नाही. शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top