उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिका सहित फुलांचे नाल्यांचे व जिल्ह्यातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे उमरगा तालुक्यातील मुरूम-आष्टा रोडवरील बेनेतुरा नदीवरील पुल वाहून गेल्याने शेतीचे, रस्त्यांचे तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुकसान झालेल्या माहिती संग्रहित करणे व पाठपुरावा करण्याचे काम चालू आहे व उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देखील या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांला धीर दिला. तसेच प्रशासनाला ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आ.ज्ञानराज चौगुले, मुरूम नगरपालिका नगसेवक तथा युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, आप्पासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमाले, नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, तालुका कृषि अधिकारी बिडबाग, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित होते.