दिवाळीनिमित्त व सागर ग्रुपला 18 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 107 विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
उस्मानाबाद :- सागर ग्रुप उस्मानाबाद यांच्या वतीने स्वआधार मतिमंद मुलींचे बालग्रह, आळणी
येथे सागर ग्रुपच्यावतीने 107 ब्लॅंकेटचे शुक्रवारी दि 13 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.
यावेळी सागर ग्रुपचे अध्यक्ष सचिन लोखंडे ,प्रशिक्षक राजेश नागदे सर ,गणेश पतंगे ,अजित गायकवाड ,रिझवान पठाण ,लक्ष्मण शिंदे, उमेश साठे ,विजय कांबळे, बालाजी वाघमारे, लक्ष्मण वामनराव शिंदे, रवी पवार व बालगृह चे शिक्षक यावेळी उपस्थित होते