उस्मानाबाद मध्ये कायदेशीर पध्दतीने बालक दत्तक घेण्याचा मार्ग मोकळा
उस्मानाबाद येथे इच्छुक दाम्पत्यांनी दत्तक सप्ताहाचा लाभ घ्यावा
उस्मानाबाद,दि.13(जिमाका):-समाजातील टाकून दिलेल्या बालकांना तसेच परित्यागित बालकांना हक्काचे घर मिळावे व ज्या विवाहीत दाम्पत्यांना अपत्य नाही.अशा कुटुंबाना कायदेशीर पध्दतीने बालक दत्तक मिळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दत्तक योजना राबविली जाते. सदरची योजना बाल न्याय अधिनियम 2015 व कारा गाईडलाईन अंतर्गत राबविण्यात येते.
या योजने अंतर्गत गतीमानपणे कार्यवाही व्हावी.यासाठी दि.14 नोव्हेंबर-2020 पासून दत्तक सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र दाम्पत्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,कार्यालय, प्रशासकीय इमारत कक्ष क्र.10,तळ मजला, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बी.एस.निपाणीकर उस्मानाबाद यांनी केले आहे
______________________________________________________
जाहिरात
______________________________________________________