उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, वाशी: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 1)अक्षय बाळु सिंदकर 2)तेजस नाथाभाउ साबळे, दोघे रा. शेलु, ता. वाशी यांनी दि. 19.11.2020 रोजी 08.45 वा. सु. शेलु शिवारात गावकरी- दिनेश तुकाराम शिंगाडे यांना शिवीगाळ करुन कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या दिनेश शिंगाडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 325, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, परंडा: बाळासाहेब विलास डांगे, रा. लोहारा, ता. परंडा हे दि. 24.11.2020 रोजी 02.30 वा. सु. नदी पात्र कडेच्या स्वत:च्या शेतात गेले होते. यावेळी भाऊ- रामभाऊ विलास डांगे व त्याचा मुलगा- प्रदिप, सुहास यांसह लव्हे, ता. माढा येथील समाधान लुंगसे असे चौंघे बाळासाहेब डांगे यांच्या शेताच्या कडेला असलेली वाळू काढत होते. यावर बाळासाहेब यांनी शेतातील माती वाहून जाउ नये यासाठी त्यांना वाळु काढन्यास मज्जाव केला असता त्या चौघांनी चिडून जाउन बाळसाहेब यांना शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाळासाहेब डांगे यांनी काल दि. 24.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, नळदुर्ग: दिलीप चिमणे, समाधान चिमणे, बाळु चिमणे, वामण चिमणे, यशवंत चिमणे, सर्व रा. चिवरी, ता. तुळजापूर यांनी दि. 22.11.2020 रोजी 18.00 वा. सु. लक्ष्मीनगर येथे पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- सुधाकर शिवाप्पा वाघमारे, रा. लक्ष्मीनगर, चिवरी व त्याचा मुलगा- अमोल या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुधाकर वाघमारे यांनी वैद्यकीय उचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 147, 148, 149, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद येथील विश्वास जाधव यांचे कुटूंबीय व नागनाथ पांढरे यांच्या कुटूंबीयांत दि. 24.11.2020 रोजी 19.30 व 21.00 वा. सु. भुखंडाच्या मालकीच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, सतुरने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504 अन्वये आज दि. 25.11.2020 रोजी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.