उस्मानाबाद - तुळजापूर येथे ऑनलाईन 45,854 हजार रुपयांची फसवणुक, Online fraud

0




उस्मानाबाद - तुळजापूर येथे ऑनलाईन 45,854 हजार रुपयांची फसवणुक 

पोलीस ठाणे, तुळजापूर: भारत बाळु कटकदौड, रा. काटी, ता. तुळजापूर यांना दि. 27.10.2020 रोजी 14.00 वा. सु. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने भारत कटकदौड यांना त्यांचे नाव व क्रेडीट कार्ड वरील क्रमांक इत्यादी माहिती विचारली. यावर भारत कटकदौड यांनी सारासार काहीही विचार न करता त्या अनोळखी क्रमांक धारकास ती माहिती दिली. त्या नंतर त्यांच्या मोबाईल वर आलेल्या संदेशातील मजकुराची वाचून खात्री न करता त्यातील ओटीपी त्या समोरील व्यक्तीस सांगीतला. या माहितीच्या सहायाने त्या व्यक्तीने भारत कटकदौड यांच्या बँक खात्यातील 45,854 ₹ ऑनलाईन पध्दतीने इतर खात्यात स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या भारत कटकदौड यांनी काल दि. 07.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66, 66 (अ), 67, 67 (अ) अन्वये गु तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top