मी बँकेतून बोलतोय म्हणून धारूर येथील एकास एटीएम डेबिट कार्ड च्या माध्यमातून 46 हजार रुपयांचा गंडा बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल

0



मी बँकेतून बोलतोय म्हणून धारूर येथील एकास एटीएम डेबिट कार्ड च्या माध्यमातून 46 हजार रुपयांचा गंडा बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल

उस्मानाबाद :- पोलीस ठाणे, बेंबळी: शकील उस्मान सय्यद, रा. धारुर, ता. उस्मानाबाद यांना  एका अज्ञात क्रमांकावरुन फोन कॉल आला होता. तो कॉल त्यांच्या पुतण्याने स्विकारला असता समोरील व्यक्तीने, “मी बँकेतून बोलतोय तुमचा एटीएम- डेबीट कार्ड क्रमांक व माहिती द्या.” असे सांगीतले. यावर त्यांच्या पुतण्याने समोरील व्यक्तीस चुलते- शकील सय्यद यांच्या एटीएम- डेबीट कार्ड क्रमांक व कार्डच्या पाठीमागील 3 अक्षरी सीव्हीव्ही क्रमांक त्या व्यक्तीस सांगीतले. थोड्यावेळाने त्यांना बँकेकडून ओटीपीचे संदेश आला असता त्यांच्या पुतण्याने त्या संदेशातील मजकूराची खात्री न करता ओटीपी क्रमांक त्या व्यक्तीस सांगीतला. यानंतर गेल्या 4 महिन्यांत त्या समोरील अज्ञात व्यक्तीने वेळोवेळी कॉल करुन, व्हॉट्सअप संदेश करुन आलेल्या संदेशांतील ओटीपी मागीतले असता शकील यांच्या पुतण्याने बँकेकडून आलेले ओटीपी संदेश समजावून न घेता ते ओटीपी क्रमांक समोरील व्यक्तीस वेळोवेळी सांगीतले. या प्रकारात शकील यांच्या खात्यातील एकुण 46,800 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत झाली असल्याचे शकील सय्यद यांना दि. 14.11.2020 रोजी समजले. अशा मजकुराच्या शकील सय्यद यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top